संभल : वृत्तसंस्था
लॉकडाऊनमध्येही उत्तर प्रदेशात गुन्हेगारीला आणखीनच जोर मिळाल्याचे दिसून येत आहे़ राज्यातील संभल जिल्ह्यात जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादानंतर समाजवादी पक्षाच्या नेत्याची त्याच्या मुलासहीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे़ दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे़ या घटनेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला.
Read More अर्थव्यवस्था संकटात; १५ क्षेत्रांना प्रचंड फटका बसणार
संभलचे पोलिस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपासासाठी पोलिसांचे तीन गट तयार करण्यात आलेत़ तसेच, काही लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे़ पोलिस अधिक्षकांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सपा नेते छोटेलाल दिवाकर (५०) आणि त्यांचा मुलगा सुनील कुमार (२८) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे़ शमशोई गावात ही हत्या घडली. मनरेगा अंतर्गत रस्ते-निर्माणाचे काम सुरू होते. याच्याशी संबंधित जमिनीच्या वादावरून छोटेलाल आणि सविंदर यांच्यात वाद झाला.
या वादाचे रुपांतर गोळीबारात झाले. गोळीबारात छोटेलाल आणि मुलगा सुनील कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. सपा नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होत आहे. या हत्या करणाºयांना भाजप सरकारकडून आणि पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप स्थानिक समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे़