Saturday, September 23, 2023

अजित पवार-भाजपमध्ये वादाची ठिणगी!

मुंबई : सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचा दावा सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येतो. महायुती सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे, हे नेहमीच सांगितले जाते. मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेमुळे अजित पवार गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पडळकर यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी यांना आम्ही विनंती करतो, की तुमचा पालतू कुत्रा गोप्या औवकातीच्या बाहेर भूंकला आहे. तो समाजाचा होऊ शकला नाही, आईचा होऊ शकला नाही, भावाचा होऊ शकला नाही, देवाचा होऊ शकला नाही. अशा व्यक्तीला तुम्ही वेळीच आवर घालावी. त्याला बारामतीच्या लोकांनी आधीच लायकी दाखवून दिली आहे. गोप्यासारख्या रानडुकराला वेळीच आवर घाला, असे खालच्या पातळीवर मिटकरींनी पडळकरांवर टीका केली आहे.

याअगोदर पडळकर म्हणाले की, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हे लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे. आम्ही अशा लोकांना मानत नाही. मी त्यांना पत्र देण्याचा प्रश्नच नाही. ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. अजित पवारांची आमच्याबाबतची भूमिका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचे पडळकर म्हणाले होते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या