26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम

विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आली असल्याने महाविद्यालयांना आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. यापुढे १८ वर्षांच्या पुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण आपल्याला करावे लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर तिस-या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. जगात सर्वत्र तिसरी लाट आलेली आहे. मात्र, ती लाट सौम्य होती आणि त्याची दाहकता तेवढी दिसली नाही. मिशन कवचकुंडल अभियान आपण दस-यापर्यंत ठेवले होते. ते आता आपण दिवाळीपर्यंत वाढविले आहे.

महाविद्यालयांना सुरुवात झाली आहे. काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना लसी देण्यात आलेल्या आहेत. मी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी महाविद्यालये सुरू करण्याबाबत बोललो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या