26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयचित्त्यांसाठी विशेष जम्बोजेट सज्ज

चित्त्यांसाठी विशेष जम्बोजेट सज्ज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या भारत सरकार प्रोजेक्ट चित्ता या विशेष मोहीमेत व्यस्त आहे. भारतातून नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे इंदिरा गांधींचे अधुरे राहिलेले स्वप्नच मोदी पूर्ण करतायत असेही त्यामुळे म्हणता येईल.

भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठीची हालचाल २००९ मध्ये सुरु झाली. यूपीए सरकारच्या काळात अनेक प्राणीमित्र, आंतरराष्ट्रीय संघटनांनी आफ्रिकेतून चित्ते आणता येतील का याबाबत हालचाली सुरु केल्या. मध्य प्रदेशचं कुनो नॅशनल पार्क, जैसलमेरचं शाहगड अशी काही ठिकाणंही निश्चित झाली. पण २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीने चित्ते भारतात आणायला मनाई केली. भारतातल्या वाघांच्या पुनर्वसनाचे काम सुरु असतानाच तिथे चित्ते येणार, आफ्रिकन चित्त्यांना हे हवामान मानवेल का अशी काळजी सुप्रीम कोर्टाला वाटली. पण सात वर्षानंतर २०२० मध्ये सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी भारताला मिळाली.

आफ्रिकेतून चित्य्यांचा प्रवास कसा असणार?
– नामिबियामधून सलग १६ तास प्रवास करु शकेल असे जंबोजेट यासाठी सज्ज आहे.
– प्रवासात चित्त्यांना उलट्या होतात, त्यामुळे त्यांना कमी त्रास व्हावा यासाठी हा प्रवास रात्रीचा करण्यात येणार आहे.
– प्रवासाआधी दोन तीन दिवस त्यांना काही खायला दिलं जात नाही, त्यामुळे प्रवास फार लांबू नये यासाठी इंधनासाठीही थांबायला लागू नये असे स्पेशल विमान सज्ज आहे.
– दुबईतल्या एका खासगी संस्थेचं हे विमान भारतात आधी जयपूरमध्ये येईल.
– तिथून नंतर हेलिकॉप्टरनं हे चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये रवाना केले जातील
मध्य प्रदेशात या चित्त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित असतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या