मुंबई : अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत अमृता यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे,या शुभकामना!’’ असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय क्षेत्रासह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा समाजातील विषयांवर त्या परखडपणे सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. अमृता त्यांचे फोटो व व्हीडीओही सोशल मीडियावर शेअर करत असतात.