बीसीसीआय : जुलै महिन्यात भारतीय संघ दौ-यावर जाणे अपेक्षित
नवी दिल्ली : केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करण्यास तयार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केलेय. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यातला प्रस्तावित दौरा खेळण्याची विनंती केली होती. या दौºयासाठी भारतीय संघाला क्वारंटाईन सुविधा तयार करून देण्याची तयारी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दाखवली आहे. याचसोबत या दौºयातले सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यासही श्रीलंकन क्रिकेट बोर्ड तयार आहे. श्रीलंका दौºयात भारतीय संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
‘‘लॉकडाऊन संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेते आणि काय नियम आखून देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर भारतीय संघाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार असेल तर आम्ही श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळण्यास तयार आहोत.’’ बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली. भारतात पुन्हा एकदा क्रिकेट सुरू व्हावे यासाठी बीसीसीआयही प्रयत्नशील आहे. कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात भारतीय खेळाडूंना सरावाची परवानगी मिळते का याची चाचपणी बीसीसीआयचे अधिकारी करत आहेत. सध्या सर्व क्रिकेट बोर्डांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केल्यास लंकन क्रिकेट बोर्डासाठी हा दौरा आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्यासाठी भारतातील केंद्र सरकार लॉकडाऊनसंदर्भात काय निर्णय घेते याची वाट पहावी लागणार आहे.
Read More विद्या बालनचा शकुंतलादेवी अमॅझोन प्राईम वर रिलीज होणार
टी-२० वर्ल्ड कप २०२२ साली?
कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. आॅस्ट्रेलियात होणाºया टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट आहे. विश्वचषकाबाबत काही खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपली मते मांडली आहेत. यामध्ये बहुतांशी व्यक्तींनी विश्वचषक आॅक्टोबरमध्ये होणे कठीण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयसीसी आता विषयावर गंभीर झाली आहे.काही जणांच्या मते ही स्पर्धा सध्याच्या घडीला रद्द करावी आणि ती २०२२ साली खेळवण्यात यावी, असे समजत आहे. पण यावर आयसीसीच्या बैठकीमध्येच निर्णय होऊ शकतो. आयसीसीची ही बैठक २८ मे या दिवशी होणार आहे.
बीसीसीआयला एक मेल केला होता़
नियोजित वेळेनुसार आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा होता. जून-जुलैमध्ये होणाºया या दौºयात टीम इंडिया ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका बोर्डाची इच्छा आहे की भारतीय संघाने दौºयावर यावे. यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयला एक मेल देखील केला होता़