28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाश्रीलंकेचे भारताला दोन धक्के

श्रीलंकेचे भारताला दोन धक्के

एकमत ऑनलाईन

दुबई : भारतासाठी आशिया कपमधील करो या मरो सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या दोन सामन्यात दमदार चेस करणाऱ्या श्रीलंकेने आजही चेस करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुबईच्या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करून सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंध्या उभारणे गरजेचे असते.

मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात महिश तिक्षाणाने केएल राहुलला पायचीत बाद केले. राहुल फक्त ६ धावांची भर घालून माघारी परतला. यानंतर आशिया कपमध्ये सलग दोन सामन्यात दोन अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली क्रीजवर आला. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज मधुशंकाने त्याचा शुन्यावरच त्रिफळा उडवला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या