23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याचा मंत्रिमंडळ विस्तार खोळंबला?

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार खोळंबला?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर आणि सत्तानाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शिंदे गटातले आमदार आणि सरकार या दोघांच्याही वैधता आणि पात्रतेबद्दल कायदेशीर लढाई सुरू आहे. या सगळ्यात मंत्रिमंडळ विस्तारही खोळंबला आहे.

विरोधी पक्षाकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. १ जुलैला शपथविधी झाला. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातल्या प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे, जनतेला मदत मिळण्यात अडचणी येत आहेत, असा आरोप विरोधी पक्षाकडून वारंवार केला जात आहे. आता शिंदे-ठाकरे प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. तोवर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार खोळंबण्याची चिन्हं दिसत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारावर न्यायालयाने थेट बंदी घातलेली नाही. मात्र १६ आमदारांच्या निलंबनाची सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता फारच कमी आहे.

न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही. तो लवकरच होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल की सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, हे पाहण्यासारखे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या