27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeकोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

एकमत ऑनलाईन

मुंबई : ठाकरे सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचं टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे.

आरग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार कोरोना उपचारांमध्ये गुणकारी ठरत असलेल्या रेमडेसिविरची १० हजार इंजेक्शन बांग्लादेशकडून खरेदी करणार आहे. तत्पूर्वी, रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून कऱण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचं सांगितलं होतं.

Read More  दिलासादायक :लातुरात कोरोनाबाधित बालकांपैकी एकाची कोरोनावर मात

कोरोनावर लस विकसित करण्याचे काम संपूर्ण जगभरातील संशोधक, डॉक्टर्स करत आहेत. त्याच दरम्यान बांगलादेशमधील बेक्सिमको फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीने कोरोनावर प्रतिबंध करणारे औषध काही दिवसांपूर्वी बनवल्याचा दावा केला होता. सध्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जे औषधे वापरली जात आहेत त्यापैकी रेमडेसिवीर या औषधाचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या