24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रऔद्योगिक गोष्टींकडे राज्याचे दुर्लक्ष; वेदांता-फॉक्सकॉन वादावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

औद्योगिक गोष्टींकडे राज्याचे दुर्लक्ष; वेदांता-फॉक्सकॉन वादावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

एकमत ऑनलाईन

नागपूर : गुजरातने चांगली ऑफर दिल्याने प्रकल्प गुजरातला गेला असल्याचे राज ठाकरे म्हणाले. औद्योगिक गोष्टींकडे राज्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यात आलेला उद्योग बाहेर का गेला याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल करत नेमकं कुठं फिस्कटलं याची चौकशी व्हावी, असे राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नागपूर दौ-यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. काही दिवसांपासून चर्चेत आलेला विषय वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवला यावर त्यांनी मत व्यक्त केले आहे. याधीचा संदर्भ देत ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प आपल्याकडे येतो तेव्हा त्यासाठीच्या पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्यात फक्त उद्योग येत नाही तर त्यासोबत रोजगारनिर्मिती होते, भागाचा विकास होतो. महाराष्ट्र मोठा होण्याचे कारणच हे आहे.

भारतामध्ये येणा-या उद्योगांची पहिली पसंती महाराष्ट्र असतो. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते. बाहेरच्या देशातून येणा-या उद्योगांना महाराष्ट्रात येण्यासाठी पहिली पसंती मिळते हे राज्याचे भाग्य असेल तर तो आपण स्वत:च्या हाताने उद्योग घालवतोय यासारखे दुसरे दुर्दैव नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

तसेच येणा-या उद्योगाकडून पैसे मागितल्यास कोण येईल, असेही ते म्हणाले. गुजरातने जास्त पैसे दिल्यामुळे वेदांता गुजरातला गेला असल्याचा अंदाजही राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांनी बोलताना विलासराव देशमुख यांच्याबद्दलचा एक किस्साही शेअर केला. विलासरावांच्या काळात आलेला उद्योग तामिळनाडूत गेल्याचा किस्साही यावेळी सांगितला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या