जागतिक आरोग्य संघटनेने लक्षण नसलेल्या रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी असल्याचे म्हटले होते. डब्ल्यूएचओच्या कोरोना व्हायरस रिस्पाँसचे प्रमुख मारिया वेन करखोव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की, आम्हाला जे आकडे मिळाले आहेत ते दर्शवतात की खूप असे खूपच कमी प्रकरणात होते की जेथे विना लक्षण असणाऱ्या व्यक्तीद्वारे दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे. मात्र आता डब्ल्यूएचओने आपले हे विधान मागे घेतले आहे. डब्ल्यूएचओच्या या दाव्याने खळबळ उडाली होती.
मारिया यांनी सांगितले होते की, आम्हाला अनेक देशांचा सविस्तर अहवाल मिळाला आहे. ज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा उल्लेख आहे. या देशात लक्षण नसलेल्या रुग्णांचा देखील अभ्यास केला. अशा लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींशी देखील संपर्क केला व त्यांच्यामध्ये सेकेंडरी ट्रांसमिशन झाले नसल्याचे आढळले. मात्र आता त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी दिलेली ही माहिती केवळ 2-3 अभ्यासांवर आधारित होती. लक्षण नसलेल्या रुग्णांकडून संसर्ग पसरत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. केवळ एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी असे सांगितले होते. कोणतीही डब्ल्यूएचओची पॉलिसी घोषित करत नव्हते.
Read More नियोजित ट्रामा केअर व जलशुद्धीकरण प्रकल्पाची आमदार धिरज देशमुख यांच्याकडून पाहणी
मारिया यांनी सांगितले होते की, आम्ही या आकड्यांचा अभ्यास करत आहोत. आम्ही आणखी इतर देशांकडून माहिती गोळा करत आहोत. विना लक्षण असलेली जी प्रकरण समोर आली आहेत, त्यांच्यामध्ये हलक्या स्वरूपाची लक्षण असतात. यातील अनेकांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी समस्या नसते, मात्र थोडीफार लक्षण असतात. त्या म्हणाल्या की, लक्षण नसलेल्या रुग्णांकडून संसर्ग पसरतो की नाही याबाबत ठोस उत्तर नाही. वैज्ञानिक याचा शोध घेत आहेत.
संसर्गजन्य रोग विशेषज्ञ आणि येल यूनिव्हर्सिटीचे सहाय्यक प्रा. मनीषा जुठानी यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात एक अभ्यास समोर आला होता, ज्यात समोर आले होते की लक्षण दिसण्याच्या दोन-तीन दिवस आधी लोक दुसऱ्यांना संक्रमित करत आहे. 40 टक्के संसर्ग हा लोक आजारी पडल्याने पसरले आहे. हे लोक आजारी पडण्याआधी संसर्ग पसरवत होते.