Saturday, September 23, 2023

स्टीव्ह वॉ सर्वांत स्वार्थी क्रिकेटपटू : शेन वॉर्न

नवी दिल्ली : कर्णधार स्टीव्ह वॉ, यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट, फिरकीपटू शेन वॉर्न, सलामीवीर मार्क वॉ, मॅच फिनिशर मायकल बेवन, वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांसारखे सारे खेळाडू एकाच वेळी एकाच संघात असणे कोणत्याही संघासाठी सुवर्णकाळापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियन संघाने तो काळ अनुभवला.

या आणि त्यांच्यानंतर आलेल्या काही प्रतिभावान खेळाडूंच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९९९, २००३ आणि २००७ असे सलग तीन विश्वचषक जिंकले. पण इतके प्रतिभावान खेळाडू एकत्र संघात असले की आपसांत स्पर्धा आणि हेवेदावे असणारच. त्यावेळी याबाबत कोणी फारसे बोलले नाही. मात्र आता शेन वॉर्नने आपल्या मनातील खदखद एका ट्विटवर रिप्लाय देताना व्यक्त केली.

Read More  संरक्षण क्षेत्रात 74 % FDI,तर कोळसा उद्योगाला 50 हजार कोटी 

वॉर्नने आपल्या आत्मचरित्रात स्टीव्ह वॉ स्वार्थी खेळाडू असल्याचे म्हटले आहे. तसेच तो स्वत:च्या धावांकडेच लक्ष द्यायचा असेही वॉर्नने नमूद केले आहे. या दरम्यान रॉब मूडी नावाच्या ट्विटर अकाऊंटवर क्रिकेट चाहत्याने एक व्हीडीओ शेअर केला. त्या व्हीडीओमध्ये चाहत्याने स्टीव्ह वॉ याने किती वेळा दुस-या फलंदाजांना धावचीत केले किंवा तो किती रन आऊटमध्ये सहभागी होता, याबद्दलची आकडेवारी दिली.

त्या चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले की स्टीव्ह वॉ त्याच्या आंतरराष्ट्ररीय कारकीर्दीत एकूण १०४ रन आऊटमध्ये सहभागी होता. त्यापैकी ७३ वेळा त्याचा सहकारी फलंदाज धावचीत झाला. ते कमनशिबी फलंदाज या व्हीडीओमध्ये बघा. यासोबत त्या चाहत्याने व्हीडीओदेखील शेअर केला. चाहत्याच्या त्या व्हीडीओवर शेन वॉर्नने रिप्लाय देत स्टीव्ह वॉ बद्दल आपले मत व्यक्त केले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या