24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeअहमदाबादेत पुन्हा पोलिसांवर दगडफेक

अहमदाबादेत पुन्हा पोलिसांवर दगडफेक

एकमत ऑनलाईन

अनेकांची धरपकड : प्रवासाला पोलिसांनी आडकाठी केल्यानंतर मजुर संतप्त

अहमदाबाद: अहमदाबाद शहरात स्थलांतरीत मजुरांकडून पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. आज सोमवारी वस्त्रपुरा भागात हा प्रकार घडला. या मजुरांच्या पुढील प्रवासाला पोलिसांनी आडकाठी केल्यानंतर मजुर संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवर हा हल्ला केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी या जमावावर अश्रुधूर आणि लाठीमाराचा वापर केला. त्यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली.

Read More  नियमाचे उल्लंघन करणा-यांना दिल्ली पोलिसांनी शिकवला धडा

या मजुरांनी पोलिसांच्या गाड्यांवर तसेच रस्त्यावरील अन्यही वाहनांवर दगडफेक केल्याने तेथे मोठीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आक्रमक रूप धारण केल्यानंतर हे मजूर अन्यत्र पळून गेले. आता त्या भागाची नाकेबंदी करून त्यांना शोधून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अद्यापही अहमदाबादेत हजारो मजूर अडकून पडले असून त्यांना त्यांच्या गावी जाण्यास अनुमती दिली जात नसल्याने ते सतत पोलिसांवर हल्ले करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या