27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रबालीश चर्चा बंद करून शेतक-यांच्या बांधावर पोहोचा

बालीश चर्चा बंद करून शेतक-यांच्या बांधावर पोहोचा

एकमत ऑनलाईन

यवतमाळ : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दोन सदस्यीय सरकार दिल्लीच्या इशा-यावर चालत आहे. दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही.

त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांवरही वारंवार तारखा देण्याची केविलवाणी वेळ आली आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून आल्यानंतर यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार यांनी राळेगाव, मारेगाव व वणी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. येथील परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, कोण, कधी, कुठे दौरा करीत आहे, या बालीश चर्चा बंद करून सत्ताधा-यांनी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी त्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याची संवेदनशीलता दाखवावी. नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांप्रमाणे मदत द्यावी तसेच शेतमजुरांनादेखील मदतीचा हात द्यावा, असे पवार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या