Saturday, September 23, 2023

कुस्तीपटूंची फरफट थांबवा

मुंबई : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यावर सन्मानजनक तोडगा काढावा अशी विनंती मनसे अध्यध राज ठाकरे यांनी केली आहे. २८ मे रोजी कुस्तीपटूंची जी फरफट झाली ती पुन्हा होऊ नये यासाठी आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावे असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ज्यांचा गौरव आपण देश की बेटियाँ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदके बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे रोजी ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसेच आपण स्वतः या विषयांत लक्ष घालून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि सन्मानजनक तोडगा काढावा आणि भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

 

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या