रायगड : श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 13 हजार 541 जणांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
Read More आनंदाची बातमी! 65 लाख निवृत्तीधारकांच्या पेन्शनमध्ये होणार वाढ
किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रेवदंडा येथील साळाव पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.