28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयदहशतवादाविरुद्ध कठोर पावले

दहशतवादाविरुद्ध कठोर पावले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सीमेपलीकडून होणा-या हल्ल्यांविरोधात भारत कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. दहशतवादाशी कठोरपणे सामना केला जाईल. बांगला देशातून होणारी घुसखोरी जवळपास थांबली असून देशाच्या पूर्व सीमेवर शांतता आणि स्थिरता आहे असे म्हणत सीमेपलीकडील दहशतवादाबाबत जम्मूतील सुजवानमध्ये दहशतवादाचा मोठा कट उधळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे.

राजनाथ सिंह यांनी हा संदेश अशावेळी दिला आहे, जेव्हा एक दिवसापूर्वी जम्मूतील सुजवानमध्ये दहशतवादाचा मोठा कट उधळून लावला गेला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार दि. २४ एप्रिल रोजी जम्मू दौ-यावर जाणार आहेत. गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र पुरस्कार सोहळ्याला संरक्षण मंत्री उपस्थित होते. आसाम सरकारने १९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ या सोहळ्याचे आयोजन केले आहे. हुतात्म्यांनी बांगलादेश मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.

दहशतवाद नष्ट करण्याची मोहीम सुरू
सरकार भारतातून दहशतवाद नष्ट करण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. भारत आपल्या भूमीवर हल्ला झाल्यास कठोर प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे दाखवून दिले आहे. भारत जो तणाव पश्चिम सीमेवर हाताळत आहे तो पूर्व सीमेवर नाही. कारण, बांगलादेश हा मित्र देश आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

एएफएसपीए प्रभावी होण्यासाठी परिस्थिती जबाबदार
अलीकडेच ईशान्येकडील विविध भागातून हटवण्यात आल्यावर राजनाथ म्हणाले, सरकार परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य पावले उचलत आहे. एएफएसपीए कायमस्वरूपी लागू व्हावा असे लष्कराला वाटते हा भ्रम आहे. एएफएसपीए प्रभावी होण्यासाठी परिस्थिती जबाबदार आहे, लष्कर नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या