27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeखेळाडू व पंचांसाठी कठोर नियम

खेळाडू व पंचांसाठी कठोर नियम

एकमत ऑनलाईन

आयसीसी : पंचांना ग्लोव्हज वापरणे बंधनकारक

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन महिने ठप्प असलेले क्रिकेट सामने पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आयसीसीने पहिलं पाऊल टाकलं आहे. क्रिकेटचा सराव आणि सामने सुरू करण्यासाठी आयसीसीने सर्व सदस्यांसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. ज्यात क्रिकेट मालिका सुरू होण्याआधी १४ दिवसांचा आयसोलेशन कॅम्पपासून संघ व्यवस्थापनात प्रमुख वैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत. खेळाडूंच्या सरावाची जागा, ड्रेसिंग रूम स्वच्छ ठेवण्यापासून सरकारी परवानगीशिवाय सामने खेळवता येणार नाहीत असे अनेक नियम आयसीसीने घालून दिले आहेत.

याव्यतिरिक्त खेळाडू आणि पंचांसाठीही आयसीसीने काही नवीन नियम आखून दिलेले आहेत. सोशल डिस्टन्स्ािंगचा महत्त्वाचा नियम पाळण्यासाठी खेळाडूंची टोपी, गॉगल, टॉवेल, जर्सी पंच सांभाळणार नाहीत. बºयाचदा गोलंदाजीदरम्यान गोलंदाज आपला गॉगल किंवा टोपी ही पंचांकडे सोपवतो. मात्र आयसीसीच्या नवीन नियमांनुसार आता ही पद्धत बंद करण्यात येणार आहे. याचसोबत पंचांना स्वतंत्र ग्लोव्हज देण्यात येणार आहेत. याचसोबत आपली कोणतीही वस्तू आता खेळाडू आपल्या सहकाºयांकडेही देऊ शकणार नाहीत. मात्र गोलंदाजीदरम्यान खेळाडूंच्या वस्तू कोण सांभाळणार याबद्दल अद्याप स्पष्ट नियम आयसीसीने सांगितले नाहीत.

चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर न करण्यासाठी आयसीसीच्या समितीने याआधीच शिफारस केली आहे. याचसोबत आयसीसीने खेळाडूंना सामना सुरू झाल्यानंतर चेंडूला डोळे, नाक, तोंडाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायचा सल्ला दिला आहे. याचसोबत सराव सुरू असताना खेळाडूंना टॉयलेट ब्रेक घेण्यासही आयसीसीने मनाई केली आहे. या सर्व नियमांचा विचार करून खेळाडूंनी सरावाच्या जागी यावे असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. याचसोबत स्वत:चे साहित्य हे सराव करण्याआधी व झाल्यानंतर स्वच्छ करण्याचे निर्देशही आयसीसीने खेळाडूंना दिले आहेत.

Read More  लोहारा तालुक्यात कोरोनाबाबत नागरिकांत गांभीर्य दिसेना

सरावादरम्यान शौचालयास जाता येणार नाही
कोरोना व्हायरसमुळे येत्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये बरेच बदल दिसू शकतात. कोरोनानंतर क्रिकेटपटूंना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. उदाहरणार्थ, त्यांना सराव दरम्यान शौचालयात जाण्याची परवानगी नाही. खेळाडूंना त्यांची टोपी किंवा सनग्लासेस आॅन फील्ड पंचांना देता येणार नाही. सामन्यापूर्वी आणि नंतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये कमी वेळ घालवावा, अशी आयसीसीची इच्छा आहे. आयसीसी क्रिकेट समितीने यापूर्वीच चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घालण्याची शिफारस केली आहे. आयसीसी मार्गदर्शक सूचनांनुसार, खेळाडू आपले वैयक्तिक सामान टोपी, टॉवेल्स, सनग्लासेस, जंपर्स इत्यादी पंच किंवा संघातील खेळाडूंकडे सोपवू शकत नाहीत. त्यांना शारीरिक अंतर राखता आले पाहिजे. पंचांना चेंडू पकडताना मोजेही वापरावे लागतात. हेल्मेट्सप्रमाणेच खेळाडू आपले सामान आणि सनग्लासेस मैदानावर ठेवू शकत नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या