24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्ये भरदिवसा विद्यार्थीनीची हत्या

औरंगाबादमध्ये भरदिवसा विद्यार्थीनीची हत्या

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा महाविद्यालयाजवळ झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महाविद्यालयाजवळून ओढत नेत एका विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. यामध्ये आरोपीने तरुणीला कॉलेजपासून चक्क २०० फूट ओढत नेत तिची हत्या केली. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला नाही, असेच म्हणावे लागेल.

मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घडली घटना असून याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या