22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयविद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन कोर्स करता येणार

विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन कोर्स करता येणार

एकमत ऑनलाईन

यूजीसीच्या नवीन गाईडलाईन्स जारी
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे मॅनेजमेंट, लॉ आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये मल्टिपल कोर्स एन्ट्री-एक्झिट पर्याय देण्यात आला आहे. तसेच त्याच कोर्ससाठी पुन्हा अ‍ॅडमिशन मिळवण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी एकापेक्षा जास्त कोर्स करता येऊ शकणार आहेत. यूजीसीचा हा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासादायक ठरणारा आहे.

यूजीसीने विद्यार्थ्यांना आता मल्टिपल मोड कोर्सचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यूजीसीकडून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारे या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन कोर्सचा पर्यायही उपलब्ध असेल आणि एकाच वेळी त्याला दोन सर्टिफिकेटही मिळणार आहेत. यूजीसीचा हा निर्णय २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार असून त्यानुसार सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी धोरण आखावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना सुसंधी
यूजीसीच्या या नव्या गाईडलाईन्समुळे विद्यार्थी आता त्यांच्या हिशोबाने वेगवेगळे कोर्स करू शकणार आहेत. यामध्ये सेमिस्टरप्रमाणे वर्गात उपस्थित राहून हे कोर्स करता येऊ शकतील. तसेच ऑफलाईन पद्धतीने हे कोर्स करू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एकाच वेळी हे कोर्स करता येऊ शकणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या