18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रआव्हाडांविरोधात दाखल गुन्ह्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा

आव्हाडांविरोधात दाखल गुन्ह्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा

एकमत ऑनलाईन

– राज्य महिला आयोगाचे ठाणे पोलिसांना आदेश
मुंबई : जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याची आता राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. ठाणे पोलिसांना याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी राज्य महिला आयोगाकडे जितेंद्र आव्हाडांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार केली आहे. तसेच, तक्रारदार महिलेवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलिसांना गुन्ह्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्वत: रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

ठाणे पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, राज्य महिला आयोगास ऋता जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्यानुसार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द आपल्या परिक्षेत्रातील मुंब्रा पोलिस ठाणे येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दाखल केलेला गुन्हा राजकीय सूडबुध्दीने दबावतंत्र वापरून केला असल्याने सदरील गुन्हा रद्द करण्यात यावा व फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ऋता आव्हाड यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या