श्रीहरिकोटा : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने नवीन स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल एसएसएलव्ही-डी २ लाँच केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्च सेंटर येथून शुक्रवारी सकाळी ९.१८ वाजता हे प्रक्षेपण झाले. एसएसएलव्ही-डी २ १५ मिनिटांच्या उड्डाणात ३ उपग्रह प्रक्षेपित केले.
या उपग्रहांमध्ये अमेरिकेचे जानुस-१, चेन्नईच्या स्पेस स्टार्ट-अपचे आझादी सॅट-२ आणि इस्रोचे ईओएस-७ यांचा समावेश आहे. एसएसएलव्ही-डी २ पृथ्वीच्या खालच्या कक्षेत १५ मिनिटांपर्यंत उड्डाण केले, येथे रॉकेटने ४५० किमी दूरच्या कक्षेत उपग्रह सोडले. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी एसएसएलव्ही-डी२ च्या प्रक्षेपणानंतर सांगितले, आता आपल्याकडे नवीन प्रक्षेपण व्हेईकल आहे. एसएसएलव्ही-डी २ ने दुस-या प्रयत्नात उपग्रहांना कक्षेत यशस्वीरित्या सोडले आहे.
एसएसएलव्हीचा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणे आहे. यासोबतच पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल चा वापर आत्तापर्यंत प्रक्षेपणात मोठ्या प्रमाणात केला जातो. एसएसएलव्हीमुळे ते आता मोठ्या मोहिमांसाठी फ्री राहील. एसएसएलव्ही ५०० किमी अंतरावरील प्लॅनर ऑर्बिटमध्ये १० ते ५०० किलो वजनाची वस्तू वाहून नेऊ शकते.
सॅटेलाइट्सचे वैशिष्ट्ये
एसएसएलव्ही-डी २ सह गेलेल्या पेलोड्समध्ये जानूस १ चा समावेश आहे. हे एक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर आहे. आझादी सॅट-२ हे एक स्मार्ट सॅटेलाइट मिशन आहे. हे लॉरा आणि रेडिओ संप्रेषण क्षमता प्रदर्शित करेल. संपूर्ण भारतातील ७५ शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांनी हे तयार केले आहे.
पहिले मिशन अयशस्वी झाले होते
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एसएसएलव्ही-डी २ ची पहिली मोहीम अयशस्वी झाली होती. त्यानंतर वाहनात बदल करण्यात आले. हे लहान उपग्रह प्रक्षेपण मार्केटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.