28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयस्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम ‘गगन’ची चाचणी यशस्वी

स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम ‘गगन’ची चाचणी यशस्वी

एकमत ऑनलाईन

अजमेर : गगन या भारताच्या स्वत:च्या उपग्रहावर आधारित नेव्हिगेशन सिस्टमद्वारे प्रथमच इंडिगो या विमानाचे शुक्रवार दि. २९ एप्रिल रोजी यशस्वी लँडिंग झाले आहे.

गगन म्हणजेच जीपीएस सहाय्यित जीईओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन नावाच्या भारताच्या स्वत:च्या उपग्रहावर आधारित ऑगमेंटेशन सिस्टमद्वारे प्रथमच विमानाचे लँडिंग यशस्वी झाले आहे. राजस्थानमधील अजमेरजवळील छोट्या विमानतळावर या स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीमची चाचणी झाली. यामुळे भारत आता यूएस, जपान आणि युरोप या गटात सामील झाला आहे.

स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम गगन वापरून विमान उतरविणारी इंडिगो ही देशातील पहिली एअरलाइन बनली आहे. यासह भारत आशियातील पहिला देश बनला आहे ज्याकडे स्वत:ची स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम आहे.

इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थानमधील किशनगड विमानतळावर बुधवारी सकाळी एटीआर-७२ विमान जीपीएस-सहाय्यित जिओ-ऑगमेंटेड नेव्हिगेशन (जीए-जीएएन) वापरून उतरविण्यात आले.

एएआयने केली यंत्रणा विकसित
केंद्राच्या विमानतळ प्राधिकरणाने(एएआय) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) यांनी संयुक्तपणे ही नेव्हिगेशन प्रणाली विकसित केली आहे. विमानाच्या लँडिंगसाठी धावपट्टीजवळ येत असताना मार्गदर्शनासाठी गगन प्रणाली वापरली जाते. त्याची अचूकता विशेषत: इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम(आयएलएस) स्थापन नसलेल्या लहान विमानतळांसाठी उपयुक्त आहे.

उड्डाणाला होणारा विलंब कमी होणार
गगन भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे आधुनिकीकरण करेल, उड्डाणाला होणार विलंबही कमी करेल. यासह इंधन वाचवेल आणि उड्डाणाची सुरक्षाही सुधारेल, असे निवेदनात सांगण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीआय) १ जुलै २०२१ नंतर भारतात नोंदणीकृत सर्व विमानांना गगन सिस्टीम सुसज्ज करण्याचा आदेश जारी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या