16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रइस्रोच्या अवजड उपग्रह प्रक्षेपक यंत्राची यशस्वी चाचणी

इस्रोच्या अवजड उपग्रह प्रक्षेपक यंत्राची यशस्वी चाचणी

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : तामिळनाडूच्या महेंद्रिगिरी येथे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या (इस्रो) प्रणोदन संकुलातील (प्रोपल्शन कॉम्प्लेक्स-आयपीआरसी) अतिउच्च पातळी चाचणी केंद्रात (हाय अल्टिट्यूड सेंटर) अवजड उपग्रह प्रक्षेपक यंत्र ‘सीई-२० इंजिन’ची चाचणी यशस्वी झाल्याचे ‘इस्रो’तर्फे शनिवारी जाहीर करण्यात आले. हे ‘इस्रो’चे सर्वात अवजड प्रक्षेपक यंत्र आहे.

या इंजिनाचा उपयोग ‘एलव्हीएम ३-एम ३’ मोहिमेसाठी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘वनवेब इंडिया-१’च्या आणखी ३६ उपग्रहांना प्रक्षेपित केले जाणार आहे. लंडन येथील दूरसंचार उपग्रह क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वनवेब’ कंपनीच्या या उपग्रहांना ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) पुढील वर्षांच्या प्रारंभी प्रक्षेपित करेल.

२३ ऑक्टोबरला ‘एनएसआयएल’तर्फे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ‘वन वेब’च्या पहिल्या टप्प्यातील ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर ‘सीई-२०’ या उपग्रह प्रक्षेपकाच्या अवजड यंत्राच्या प्रक्षेपणासंबंधित चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली. ‘लाँच व्हेईकल मार्क-३’ हे ‘इस्रो’चे सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपक आहे. चार टन वजनश्रेणीतील उपग्रहास भूस्थिर कक्षेत सोडण्याची त्याची क्षमता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या