मुंबई : सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका अज्ञात इसमाने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली अन् अचानक त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ केली गेली. मुंबई पोलिसांनी यावर अॅक्शन घेतल्याचं दिसून आलं आहे.
बांद्रे पोलिस ठाण्यात या संदर्भात केस नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांची एक टीम सलमानच्या घरी पोहोचलीय अन् चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
सलमान खानला काही दिवसांपूर्वीच गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईनं जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोई तोच ज्याच्यावर पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला याची हत्या केल्याचा आरोप आहे.
सध्या तो तिहार जेलमध्ये कैदेत आहे. बिश्नोई म्हणाला होता की सलमानसोबत देखील तेच होणार,जे सिद्धू मुसेवालासोबत झाले. धमकी देणारे ते पत्र सलमानला कोणी आणि कुठून पाठवले याबाबत अद्याप काही माहिती पडलेलं नाही. पण या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाची चर्चा सुरू झालीय.