नागपूर : नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे.
सकाळी ८ वाजेपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रथम मतपेट्या उघडून बाद मते बाहेर काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली.
पहिल्या पसंतीच्या मतावर उमेदवार विजयी झाल्यास संध्याकाळी ६ वाजेपर्यंत निकाल लागू शकतो. मात्र, दुस-या पसंतीवर निकाल लागल्यास रात्री निकालासाठी उशीर लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत.
दरम्यान,कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले पाच हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. सुधाकर आडबाले यांना आतापर्यंत २८ पैकी १८ टेबलवर १० हजारांच्या आसपास मते मिळली आहे. त्या तुलनेत नागो गाणार यांना फार कमी मते आहेत. नागो गाणार दुस-या तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तिस-या क्रमांकावर आहे.
औरंगाबादेतून विक्रम काळे आघाडीवर, भाजपचे किरण पाटील पिछाडीवर
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील मात्र पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे ..