23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयसाखर निर्यातीवर लवकरच बंदी?

साखर निर्यातीवर लवकरच बंदी?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकार गव्हाप्रमाणे साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करीत असल्याचा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने केला आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, देशाअंतर्गत किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी सरकार जवळपास सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालू शकते. सरकार या हंगामात निर्यात १० दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित ठेवण्याचीही शक्यता आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश आहे. ब्राझील हा दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू विपणन वर्षात भारताने १८ मे पर्यंत ७.५ दशलक्ष टन साखर निर्यात केली आहे. भारतातून आयात करणारे प्रमुख देश इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया आणि आफ्रिकन देश आहेत.

कर्नाटक, महाराष्ट्र, यूपीचा ८० टक्के वाटा
विपणन वर्ष २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० मध्ये अनुक्रमे ६.२ लाख टन, ३८ लाख टन आणि ५९.६० लाख टन साखर निर्यात झाली. देशातील एकूण साखर (२४१) उत्पादनात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाटा ८० टक्के आहे. देशातील इतर प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, हरयाणा आणि पंजाब यांचा समावेश होतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या