27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयआयएएस अतहर आमिरचा डॉक्टर मेहरीनशी साखरपुडा

आयएएस अतहर आमिरचा डॉक्टर मेहरीनशी साखरपुडा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यूपीएससीमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारे आयएएस अतहर आमिर खान सध्या दुस-या लग्नामुळे चर्चेत आहे. अतहर आमिर दुस-यांदा लग्न करणार आहे. याआधी आयएएस टॉपर टीना डाबीसोबत लग्न आणि नंतर घटस्फोटामुळे चर्चेत होते. आता अतहर काश्मीरमधील एका डॉक्टरसोबत दुस-यांदा लग्नगाठ बांधणार आहे.

अतहरची होणारी पत्नी डॉक्टर मेहरीन काझी श्रीनगरमधील आहे. अतहर आणि महरीन यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती समोर आली आहे. अतहरने फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.

अतहर आमिर खानचे पहिले लग्न आयएएस टॉपर टीना डाबीसोबत झाले होते. हे लग्न बरंच चर्चेत राहिलं पण, हे जास्त काळ टिकू शकलं नाही. नंतर २०२१ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर टीना डाबीने आयएएस प्रदीप गावंडेसोबत लग्न केले.

कोण आहे डॉ. मेहरीन?
अतहर आमिर खानची होणारी पत्नी डॉ. मेहरीन काझी देखील जम्मू-काश्मीरची रहिवासी असून आणि व्यवसायाने डॉक्टर आहे. मेहरीनने मेडिसीनमध्ये एमडी पदवी घेतली आहे.

सध्या मेहरीन उमर कॉलनी, लाल बाजार, दिल्ली येथे राहात असून, तेथील रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर असण्यासोबतच मेहरीनला फॅशनमध्येही खूप रस आहे. ती सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. मेहरीनचे इन्स्टाग्रामवर २००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या