22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीचे समन्स

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीचे समन्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. तसेच सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा न घाबरता सामना करणार असून सोनिया गांधी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील असे सिंघवी यांनी सांगितले. हे प्रकरण २०१५ मध्ये तपास यंत्रणेने बंद केले होते.

दरम्यान, ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. मनी लाँड्रिंग किंवा मनी एक्सचेंजचा कोणताही पुरावा नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात फक्त इक्विटीमध्ये रूपांतरण किंवा कर्ज असल्याचे सांगत आम्ही या प्रकरणी घाबरून न जाता खंबीरपणे लढा देणार असल्याचे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.

चौकशीला सामोरे जाणार
ईडीच्या समन्सनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी स्वत: चौकशीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या परदेश दौ-यावर आहेत. ते जर आठ जूनपर्यंत भारतात परतल्यास तेही चौकशीला सामोरे जातील. परंतु त्यांना परतण्यास वेळ लागणार असल्यास ईडीकडे अधिकचा वेळ मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

प्रकरण नेमके काय?
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ५५ कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. त्यानंतर २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. २००८ मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर ९० कोटींचे कर्जही झाले होते. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनीची निर्मिती केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे ७६ टक्के शेअर होते. तर इतरांकडे २४ टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला ९० कोटींचे कर्जही दिले होते. या कंपनीने एजेएलचे अधिग्रहन केले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या