24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeऔरंगाबादसुनील केंद्रेकर यांचे आदेश : औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही

सुनील केंद्रेकर यांचे आदेश : औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही

एकमत ऑनलाईन

रुग्ण संख्या वाढली : पुण्यासह आता औरंगाबाद जिल्हाही बनला आहे कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल कॉरंन्टाईन ठेवण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आदेश. पुण्या-मुंबईतून लोकं आली म्हणून रुग्ण संख्या वाढली. नागरिकांच्या मदती शिवाय जिंकणे अशक्य. कोरोनाची लक्षण दिसल्यास लोकं घरी राहतात. ऑक्सीजनही घरीच लावण्याचा प्रयत्न करताना समोर आलं आहे, असं केंद्रेकर यांनी सांगितलं.

औरंगाबाद जिल्ह्यात आज (10 जून) सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2264 झाली आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 865 रुग्णांवर उपचार सुरु आहे. नव्याने आढळलेल्या 114 कोरोनाबाधितांमध्ये हर्सूल जेलमधील 14 कर्मचारी आणि कैद्यांचा समावेश आहे. यापूर्वीही 29 कैद्दी कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यामुळे आता हर्सूल कारागृहातील 43 कर्मचारी आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता औरंगाबाद जिल्हाही कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनला आहे. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.

Read More  सगळं सुरळीत व्हायला 2021 उजाडणार आहे- रमण गंगाखेडकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या