21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रबहूमत चाचणी होणार नसल्याची हमी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बहूमत चाचणी होणार नसल्याची हमी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय हा ११ जुलैपर्यंत घेता येणार नाही. या सगळ्या दरम्यान बहुमत चाचणीचे काय होणार, हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा प्रश्न आहे. शिवसेनेच्या वतीने वकिलांनी कोर्टाला विनंती केली की, बहुमत चाचणी संदर्भातही तुम्ही अंतरिम आदेश द्या. तसेच याकाळात बहुमत चाचणी होणार नाही, याची हमी द्या. मात्र कोर्टाने ही हमी देण्यास नकार दिला आहे.

कारण हा जर तरचा प्रश्न आहे. कोर्टाने सागितलं की, आम्ही जर तरच्या प्रश्नावर कुठलीही हमी देऊ शकत नाही. पण कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, जर बहुमत चाचणीची वेळ आली तर काही पक्षकारांना या मुद्द्यावर तातडीने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावसे वाटले तर आम्ही यावर तातडीने सुनावणी करण्यास तयार असू, असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या