25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयबापाचा अंदाज चुकीचा सुप्रियाने सिद्ध केले

बापाचा अंदाज चुकीचा सुप्रियाने सिद्ध केले

एकमत ऑनलाईन

कन्या सुप्रिया सुळेबद्दल शरद पवार यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
पुणे : सुप्रिया राजकारणात पडेल, असे मला वाटत नव्हते. हे मी ३० वर्षांपूर्वी बोललो होतो. आता तुम्ही पाहताय ती राजकारणात आली. एका बापाचे असेसमेंट चुकीचे कसे आहे, हे आज माझ्या मुलीनेच सिद्ध केले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.

पुणे डॉक्टर असोसिएशनच्या सिंगल डॉक्टर फॅमिली या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती. ज्या पालकांनी स्त्री जन्माचा, खासकरून एकच अपत्य ते ही मुलगी जन्माचा उत्सव साजरा केला आणि कुटुंब नियोजन केले. त्यासह स्त्री-पुरुष समानतेचे प्रबोधन केले, अशा कुटुंबांना आज आमंत्रित करण्यात आले होते. याच नाविन्यपूर्ण कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, माझ्या कुटुंबातील सर्व संस्काराचे श्रेय आईला आहे. शेती, संसार आणि आमचे शिक्षण याची जबाबदारी तिने स्वत: पेलली. घर मोठे होते, मुले आणि मुलांनाही शिक्षण दिले. वडील एकटेच शिक्षित होते. त्यानंतरच्या पिढीत सगळेच उच्चशिक्षित झाले. हे आईमुळे घडले. त्यामुळे सबंध महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा बदलला. म्हणूनच जेव्हा निर्णय घेण्याचे पद माझ्याहाती आले, तेव्हा मी महिलांना प्राधान्य दिले.

उत्तर भारतात अद्यापही महिलांना म्हणावे तसे प्राधान्य दिले जात नाही. हे लोकसभेत अनेकदा जाणवते. अगदी स्वपक्षीयांनाही माझे म्हणणे सुरुवातीला पटले नव्हते. याबद्दल मानसिकता बदलायला हवी. आम्ही म्हणजे राजकीय प्रमुख. यांनी योग्य दिशा दाखवायला हवी. लोकसभा आणि विधानसभा येथे महिलांची संख्या कमी आहे. का, तर महिला निवडून येईल, अशी खात्री अनेकांना वाटत नाही. निवडून आलीच तर ती महिला आपले काम करेल का? त्यामुळे मतदारांची तीच मानसिकता आहे. विधानसभा आणि लोकसभेत महिलांची संख्या वाढवायची असेल तर यासाठी आपल्याला जनमत तयार करावे लागेल, असेही पवार म्हणाले.

 

कुटुंबनियोजनानंतर काय
सामना करावा लागला?
मला फारसा काही सामना करावा लागला नाही. मात्र निवडणुकीच्या वेळी एकच मुलगी या प्रश्नाला सामोरे जावे लागले. एकदा मला प्रचारावेळी विचारले गेले, एकच मुलगी मग अग्नी कोण देणार, म्हणजे लोकांना अग्नी कोण देणार, याची काळजी. मात्र, मला ती काळजी नव्हती. मुलगी सगळे करू शकते. हे तेव्हाही मी सांगितले.

 

आईच्या पेशन्समुळे
संसार टिकला : सुळे
माझ्या आईकडे खूप पेशन्स आहेत. त्यांच्या पेशन्समुळेच बहुदा त्यांचा संसार इतका काळ टिकला. (मिश्किल टिपणी) मी आईकडून पेशन्स घेतले आहेत, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी माझे वडील खूप स्ट्रॉंग आहेत, अशा शब्दांत गौरवोद्गार काढले.

इंदिरा गांधींसारखे नेतृत्व क्वचितच
माझे आणि इंदिरा गांधींचे ब-याच मुद्यावर वाद झाले. पण असे असले तरी मी हे सांगू इच्छितो की, इंदिरा गांधींसारखे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते, असे शरद पवार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या