25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे मुख्यमंत्री झाल्याचे सुप्रिया सुळेंना सहन होईना

शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे सुप्रिया सुळेंना सहन होईना

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. फक्त शरद पवारसाहेबच राज्यात राजकीय बदल करु शकतात, असा समज सुप्रिया सुळेंचा आहे.

त्यांना वाटते की त्यांचे वडीलच केवळ राज्याच्या राजकारणात बदल करु शकतात. असे असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या समजाला छेद दिला हे त्यांना पटलं नाही. एका सर्वसामान्य माणसाला भाजपने संधी दिली. एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांला मुख्यमंत्री केल्याचे सुप्रिया ताईंना पटलेलं नाही, असे पडळकर म्हणाले आहेत.

अजितदादा पवार फुटले होते तेव्हा त्यांच्या मागे २ आमदार राहिले नाहीत एकनाथ शिंदेंच्या मागे ५० आमदार आहेत. हे सुप्रिया सुळेंना रुचलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. असेही पडळकर म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. चांगलं काम करत आहेत. हे यांना सहन होईना. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगले निर्णय घेत आहेत. राज्यातील जनतेच्या हिताचं काम करत आहेत. त्यांचं हे काम राष्ट्रवादीला पटत नाहीये, असंही पडळकर म्हणालेत.
गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही लोकांच्या घरी जात आहेत. तर त्याचाही त्यांना त्रास होतोय.

भाजपमुळे शरद पवार गणपतीची आरती करतायेत
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमच्या गरवारे क्लब हाउसमध्ये शरद पवार यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. या प्रसंगी शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हही केलं होतं. त्यावरही पडळकर बोलले आहेत. इथून पाठीमागे कधीही शरद पवारांनी गणपतीची आरती करतानाचे फोटो पाहायला मिळाले नव्हते. पण आता त्यांचे फोटो व्हीडिओ पाहायला मिळाले. हे सगळं त्यांना भाजपमुळे करावं लागतंय, असंही पडळकर म्हणालेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या