29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeराष्ट्रीयसुरावटींनी झालो ‘राममय’!; दीदींच्या आठवणींत मोदी भावूक

सुरावटींनी झालो ‘राममय’!; दीदींच्या आठवणींत मोदी भावूक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती. ज्या आवाजाने केवळ भारतालाच नाही तर सा-या जगातील संगीतप्रेमींना आपल्या सुरावटींनी वेड लावलं त्या दीदींच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम चाहते करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दीदींना आदरांजली वाहत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दीदींचे जाणे हे तमाम भारतीयांच्या काळजाला छेद करून जाणारी गोष्ट होती. मात्र त्यांचे सूर हे आपल्या मनात घर करून आहेत. त्यांच्या सुरावटीत आपण प्रत्येक जण चिंब झाल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.
अयोध्या शहरातील एका चौकाला गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे.

याविषयी मोदींनी आपल्या भाषणातून त्याचा उल्लेख करत लता दीदी आणि त्यांची रामभक्ती याबद्दल सांगितले. ते म्हणाले, दीदी म्हणायच्या माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो. दीदींनी त्यांच्या स्वरांनी सा-या जगाला जोडले. अयोध्येतल्या चौकाला लता दीदींचे नाव देण्यात आले आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

ज्याठिकाणी लता दीदी चौक आहे त्याठिकाणी आता सांस्कृतिक संबंध आणखी दृढ होतील. लता दीदींच्या नावाने चौक ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. त्यांचे सूर आणि संगीताबद्दलचे विचार आपल्यासोबत राहतील. त्यांची समाजाप्रति असलेली भूमिका, त्यासाठी त्यांनी केलेले काम हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या कामांचा आदर्श आपण ठेवण्याची गरज आहे.

मोदी म्हणाले, लता दीदींच्या सुरांनी आपल्याला राममय केले आहे. लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी लता दीदींच्या वेगवेगळ्या आठवणींना शब्दरूप दिले. मला आठवतं की, जेव्हा अयोध्यामध्ये राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले तेव्हा मला अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी लता दीदींचा फोन आला होता. अयोध्या चौकातील दीदींचे नाव आणि त्याठिकाणी उभारण्यात आलेली वीणा ही आता सर्वांचे मुख्य आकर्षण असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या