22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeक्राइमसुशांत सिंग प्रकरण :  केजे ने चौकशीत केला ऐकूण 150 नावांचा खुलासा

सुशांत सिंग प्रकरण :  केजे ने चौकशीत केला ऐकूण 150 नावांचा खुलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुशांत सिंग प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसांपूर्वी करमजीत सिंग आनंद उर्फ ​​K J ला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार करमजीत सुशांतला ड्रग्स सप्लाय करत होता. करमजीतकडून मोठ्या प्रमाणात एनसीबीने गांजा आणि चरस जप्त केले आहेत. करमजीतने एनसीबीच्या चौकशीत अनेक मोठे आणि महत्त्वाचे खुलासे केले आहे.

केजे ने चौकशीत ऐकूण 150 नावांचा खुलासा केला आहे. या 150 लोकांच्या लिस्टमध्ये केजेचे हाय प्रोफाइल क्लाइंट्स आणि मोठ्या ड्रग पेडलर्सची नावे आहेत. या लिस्टमध्ये बॉलिवूडची बऱ्याच मोठ्या नावांचा सामावेश आहे. बॉलिवूडमधील अनेकजण केजेचे क्लाइंट्स होते.

एनसीबीच्या चौकशीत केजेने कुबूल केले आहे की त्याने वेळा स्वत: सुशांत सिंग राजपूतला ड्रग्स सप्लाय केले होते. करमजीत सिंग मुंबई आणि गोव्यातील अनेक सक्रिय ड्रग्स माफियांच्या संपर्कात होता. एनसीबी आता 150 लोकांची चौकशी करत आहे ज्यांची नावे केजेने चौकशीत दिली आहेत. गरज भासल्यास एनसीबी त्यांना चौकशीसाठी समन पाठवू शकते. मिळालेल्या माहितीनुसार सूर्यदीपने केजेची ओळख रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीशी करुन दिली होती. यानंतर तो सुशांतला ड्रग्स सप्लाय करु लागला.

केजे तीन वर्षे आधी ड्रग्सच्या धंद्यात आला. घरात आर्थिक अडचणीमुळे तो तीन वर्षांपूर्वी काही पेडलर्सच्या संपर्कात आला आणि त्यानंतर अधिक पैसे मिळविण्याच्या इच्छेने तो ड्रग्सच्या व्यापारात आला. केजे आधी छोट्या-छोट्या डील करायचा. परंतु एका वर्षातच केजेने ड्रग्समध्ये आपला जम बसवला आणि ड्रग्स सप्लायर झाला. केजेची आई शिक्षिका असून त्याला एक लहान बहीण आहे आणि तो भाड्याच्या घरात रहातो. आईला केजेच्या ड्रग्स सप्लायर असल्याची काहीच कल्पना नव्हती. केजेला अटक केल्यानंतर घर मालकाने त्याच्या आईला घर खाली करण्याची नोटीस दिली आहे. केजे 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशांची परिस्थितीही आव्हानात्मक-कारमेन रेनहार्ट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या