22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रसुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु होते. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शाहू- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे यांनी शिवबंधन बांधले.

यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना उपनेतेपदाचे गिफ्ट देखील मिळाले आहे. प्रवेशावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

यावेळी ईडी , सीबीआय , निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करून संविधानिक चौकट तोडली जात आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझे हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्याचे नाही. तेव्हा मी ठरवले की शिवसेनेत जायचे. माझ्या डोक्यावर कुठल्या ईडीचे ओझे नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही.

मला अजून पीठ मिठाचे मातोश्रीमधील डबे माहित नाहीत. मी नवीन आहे. नीलमताई माझ्यासाठी आईप्रमाणे आहेत. अनेक जण म्हणाले की, मी टीका केली होती. पण आमचं एकच संविधानिक शत्रू असेल तर मी त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, असे त्यांनी म्हटलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या