16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रसुषमा अंधारेंचे विभक्त पती अ‍ॅड. वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

सुषमा अंधारेंचे विभक्त पती अ‍ॅड. वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करतात. त्याच सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

दरम्यान सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. पुढील वाटचालीसाठी सुषमा अंधारे यांनी त्यांच्या विभक्त झालेल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. कोण कोणत्या गटात जाते याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तर सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अ‍ॅड. वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांना थेट इशारा देत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा अ‍ॅड. वाघमारे यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या