Thursday, September 28, 2023

अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; दोघांना अटक

बस्ती : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या घराच्या मागे सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तिच्या कुटुंबीयांनी बलात्काराचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी बस्ती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर बलात्काराचे कलमही जोडले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. एफआयआरनुसार मोनू निषाद, राजन निषाद आणि कुंदन सिंग अशी त्यांची नावे आहेत. घटनेनंतर लगेचच मुख्य आरोपी मोनूला अटक करण्यात आली.

बस्ती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गोपाल कृष्ण चौधरी यांनी माध्यमांना सांगितले की, परिसराचे पोलीस महानिरीक्षक आणि मी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मोनू साहनी नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदनात बलात्काराची पुष्टी झाली, तर पॉकसो कायदा आणि बलात्काराची कलमे देखील जोडली जातील. असे त्यांनी सांगितले.

या घटनेवरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी यूपी सरकारवर निशाणा साधला आहे. अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, बलात्कार करणाऱ्यांविरोधात जनता ओरडत आहे पण भाजप सरकार आपल्याच लोकांना वाचवण्यासाठी बहिरे झाले आहे. भाजप हे बलात्काऱ्यांचे विश्रामगृह बनले आहे. असा आरोप त्यांनी केला. सोमवारी सायंकाळी पीडितेच्या कुटुंबीयांनी निदर्शने करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या