39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeक्रीडा रसिकांसाठी गोड बातमी

क्रीडा रसिकांसाठी गोड बातमी

एकमत ऑनलाईन

मैदानं सुरु करण्यास केंद्राची परवानगी; इतक्यात आयपीएल शक्य नाही !

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू आपल्या घरीच होते. पण आता मात्र असे होताना दिसणार नाही. कारण चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. करोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनला आता बरेच लोकं वैतागलेले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू घरीच बसून आहेत, त्यांना सरावही करता येत नाही. लॉकडाऊनमुळे एकही स्पर्धा होताना दिसत नाही. त्यामुळे चाहतेही चांगलेच वैतागलेले आहे. पण आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा चाहत्यांसाठी गोड बातमी आली आहे. या बातमीनंतर क्रीडा चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी पाहायला मिळणार आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये सुरु होणाºया काही गोष्टींमुळे खेळाडूंना हायसे वाटणार असून त्यांच्यासह चाहतेही खूष होणार आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात एकही स्पर्धा चाहत्यांना पाहता आली नव्हती. त्याचबरोबर आपले आवडते खेळाडू नेमके काय करत आहेत, हेदेखील चाहत्यांना कळत नव्हते. पण आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये चाहत्यांना या साºया गोष्टी पाहता येणार आहेत कारण आता क्रीडा क्षेत्रावरील बंधन थोडी शिथील करण्यात आली आहेत.

Read More  विलग राहणे मान्य केले तरच रेल्वे तिकीट

लॉकडाऊनमुळे खेळाडूंनी एकत्र येऊ नये, असे म्हटले होते. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या घरीच होते. पण आता मात्र असे होताना दिसणार नाही. चौथ्या लॉकडाऊनमध्ये स्टेडियम खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्पर्धा भरवता येऊ शकतात. त्यामुळेच चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी असेल. स्टेडिमबरोबरच क्रीडा संकुलेही आता खुली करण्यात येणार आहेत, जेणेकरून खेळाडूंना सराव करता येईल आणि तंदुरुस्त राहता येईल. पण हे दोन महत्वाचे निर्णय झाले असले तरी एक मोठा निर्णय मात्र अजून होऊ शकलेला नाही. चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा संकुले आणि स्टेडियम्स खुली करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ही चांगली बातमी आहे. पण हे निर्णय जरी झाले असले तरी स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांना एंट्री मात्र नाकारण्यात आली आहे. जरी एखादी स्पर्धा भरवली तरी त्यासाठी अजूनपर्यंत तरी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार नाही.

स्पर्धा प्रेक्षकांशिवाय :अरुण धुमाळ
केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलींमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि मैदानं सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र प्रेक्षकांना इथे हजेरी लावता येणार नाहीये. केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीनंतरही आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करणं शक्य नसल्याचं मत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी व्यक्त केलं आहे. सध्याच्या घडीला आयपीएलचं आयोजन शक्य नाही. मैदानं सुरु करण्यास केंद्राने परवानगी दिली असली तरीही प्रवासावर बंदी आहेच. जर प्रवासावरच बंदी असणार आहे, तर आयपीएलचं आयोजन कसं केलं जाऊ शकेल. केंद्र सरकारने दिलेल्या नवीन नियमावलींचा आम्ही अभ्यास करतोय, याचसोबत प्रत्येक राज्यातील सरकार काय नवीन नियम आखतंय हे देखील आम्ही पाहत आहोत. त्यानुसार आयपीएलसंदर्भात निर्णय घेतला जाईल.’’

Read More  भारत आमच्यावर सर्जिकल स्ट्राईक करेल-इम्रान खान

आयपीएलचं भवितव्य अधांतरीच
प्रवासावर बंदी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी असल्यामुळे बाहेरील देशांमधले खेळाडू भारतात येऊ शकणार नाहीत, याचसोबत राज्यांतर्गत प्रवासालाही बंदी असल्यामुळे खेळाडू त्यांच्या-त्यांच्या संघाच्या कँपला हजर राहू शकणार नाहीत. समजा सरकारने प्रवासाची परवानगी दिली तरीही आयपीएल संघमालक परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएल खेळवण्यासाठी तयार होणार नाहीत. आयपीएल संघाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी खेळाडूंचा स्पर्धेच सहभाग नसेल तर काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं भवितव्य अधांतरीच दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या