19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeआंतरराष्ट्रीयतैवानने मानले भारतीयांचे आभार

तैवानने मानले भारतीयांचे आभार

राष्ट्रीय दिनानिमित्त सोशल मिडियावरुन शुभेच्छा ; चीनच्या इशाऱ्याकडे भारतीयांचा काणाडोळा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : तैवानच्या राष्ट्रीय दिनी शुभेच्छा दिल्याबद्दल तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन यांनी भारतीयांचे आभार मानले आहेत. ‘तैवानच्या राष्ट्रीय दिनी शुभेच्छा दिल्याबद्दल भारतातील सर्व मित्रांचे आम्ही आभार मानतो’ असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारत सरकारने अधिकृतपणे राष्ट्रीय दिनाबद्दल तैवानला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. पण सोशल मीडियावरुन तैवानला मोठया प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या. चीन तैवानला आपलाच भाग मानतो. पण तैवानला चीनचा हा दावा मान्य नाही. तैवानचा राष्ट्रीय दिन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी भारताला तैवानचा राष्ट्रीय दिवशी या प्रदेशाचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून करुन नये असा इशारा दिला होता.मात्रभारतीयांना या इशाºयाला यत्किंचितही जुमानलेले नाही.

तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य बदलता येणार नाही, असा इशारा शनिवारी भारतातील चिनी दूतावासाने तैवानला दिला होता. चीनचा भारताप्रमाणेच तैवान बरोबरही वाद सुरु आहे. चीनकडून तैवानला सातत्याने युद्धाचे इशारे दिले जातात. पण तैवानने आता चीनच्या दादागिरीला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तैवानला अमेरिकेची भक्कम साथ मिळाली आहे. त्यामुळे चीन तिळपापड होत आहे.

श्रीपुर येथे एटीएम असून अडचण नसून खोळंबा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या