23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमंकिपॉक्स रोखण्यासाठी उपाययोजना करा

मंकिपॉक्स रोखण्यासाठी उपाययोजना करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या संचालकांनी रविवारी सदस्य राष्ट्रांना मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्याचे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर मंकीपॉक्सच्या उद्रेकाला आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जगभरात मंकीपॉक्सचा विषाणू खूप वेगाने पसरत आहे.

ज्या देशांमध्ये यापूर्वी कधीही संसर्ग झाला नव्हता अशा देशांमध्येही व्हायरसने पाय पसरले आहेत. ही सर्वात चिंताजनक बाब असल्याचे संस्थेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले. आतापर्यंत जगातील ७५ देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची १६,००० हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दक्षिण पूर्व आशिया रेंजमध्ये आतापर्यंत चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी तीन भारतातील आणि एक थायलंडचा आहे.

भारतात संसर्ग झालेले लोक हे मध्य पूर्व देशातून परतलेले आहेत. मंकीपॉक्स रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याला रोखण्यासाठी एकजुटीने प्रयत्न व्हायला हवे. तसेच उपाययोजना संवेदनशिलपणे आणि भेदभावमुक्त असाव्या असेही डॉ. खेत्रपाल यांनी नमूद केले. जागतिक आरोग्य संघटनेने(डब्ल्यूएचओ) शनिवारी सांगितले की ७० हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक ही आणीबाणीची स्थिती आहे. मंकीपॉक्स संक्रमित प्राण्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काद्वारे हा व्हायरस मानवांमध्ये पसरतो.

संक्रमीत श्वासोच्छवासामुळे मोठा परिणाम
मंकीपॉक्सचा संसर्ग संक्रमित त्वचेच्या संपर्कात आल्याने आणि श्वास सोडताना नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडणारे छोटे थेंब याद्वारे एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीपर्यंत पसरतो.

समलैंगिकांना धोका अधिक
डॉ. खेत्रपाल पुढे म्हणाल्या की, व्हायरसच्या संसर्गाचा धोका समलैंगिक लोकांना आहे. मात्र भविष्यात तो इतर लोकांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. केवळ समलैंगिक लोकांपुरतात मर्यादित राहिल असं गृहित धरू नये.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या