24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीकेतकीवर कडक कारवाई करा

केतकीवर कडक कारवाई करा

एकमत ऑनलाईन

जिंतूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियाद्वारे केतकी चितळे यांनी भावना भडकवणारे लिखाण केल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रेक्षा भांबळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस प्रशासनाला दि. १५ जून रोजी पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन लिखाण करर्णा­या युुवतीवर व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी कृषी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात गरळ ओकत अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट मुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाही करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई विजयराव, भांबळे, रामराव उबाळे, बाळासाहेब भांबळे, काळे दत्तराव,पठाण उस्मानखान, लखुजी जाधव, मते शामसुंदर, पठाण दलमीर खान, शे अहेमद बागवान,मिर्झा शाहेद बेग, डोईफोडे मनोहर, आशाताई उबाळे, संजय (बंटी) निकाळजे,चंद्रकांत बहिरट, सोहेल अहेमद, शोयब जानेमिया, हरभरे ताई, अश्विनी भवाळे, श्रद्धा पवार, आदींसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या