23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतालिबानींनी सरकारचा शपथविधी सोहळा रद्द

तालिबानींनी सरकारचा शपथविधी सोहळा रद्द

एकमत ऑनलाईन

काबूल : अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्याचे औचित्य साधत तालिबानने आपल्या सरकारचा शपथविधी सोहळ्याचे आयोजन केल्याची चर्चा होती. अमेरिकेवरील हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र आता तालिबानने सरकारचा शपथविधी सोहळा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. नुसता रद्द केला नाही यापुढे अवास्तव खर्च टाळण्यासाठी शपथविधी सोहळा होणार नाही, असे एका मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे. ९/११ हल्ल्याचे औचित्य साधत तालिबानने आपल्या सरकारचा शपथविधी सोहळ्याचे आयोजन केल्याची चर्चा होती. अमेरिकेवरील हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली आहे.

यापूर्वी ९/११ हल्ल्याचे औचित्य साधत आज शपथविधी सोहळा पार पडणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र तालिबानने घेतलेल्या या निर्णयमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तालिबान कायम दहशतवादी कारवायांना प्रोत्साहान देण्यासाठी पैसे वाया घालवत असताना असा निर्णय लोकांच्या पचनी पडत नाही. नव्या अफगाणिस्तान सरकारचा शपथविधी सोहळा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने आपले काम आधीच सुरु केले आहे. त्यामुळे शपथविधी होणार असल्याचा अफवा आहेत. असे स्पष्टीकरण तालिबान सरकारच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य इनामुल्ला सामंगानी याने ट्वीट करून केले आहे.

हंगामी सरकारची स्थापना
मंगळवारी तालिबान अफगाणिस्तानात एका हंगामी सरकारची स्थापना केली आहे. या मंत्रिमंडळात ३३ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यापैकी १४ दहशतवादी आहेत. मुल्ला मोहम्मद हसन अखुंदला अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे पंतप्रधान आहे. त्याचबरोबर मुल्ला बरादर उपपंतप्रधान, सिराजुद्दीन हक्कानी काळजीवाहू गृहमंत्री, मुल्ला याकूब संरक्षण मंत्री आणि अमीर मुत्तकी यांना परराष्ट्र मंत्रिपद देण्यात आले आहे. तर खेरउल्लाह खैरख्वा यांना सूचना व प्रसारण मंत्रिपद दिले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या