कीव्ह : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला समुारे तीन महिने झाले आहेत. जगभरातील देशांकडून हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता युद्ध संपवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचे आवाहन केले आहे. पुतिन चर्चेसाठी तयार असतील तर युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्यास युक्रेनही तयार आहे, युद्ध संपावे अशी सर्वांची इच्छा आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
युक्रेनमधील नागरिकांना सामान्यपणे जीवन जगता येण्यासाठी चर्चा हाच एक मार्ग आहे. ही बैठक आपला देश टिकण्यासाठी आणि युद्ध संपण्यासाठी गरजेची आहे. यामुळे युक्रेनचे नागरिक देशात परतू शकतील. तसेच यामुळे जगात शांतता टिकून राहील, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. झेलेन्स्की यांनी युरोपीय संघावर टीका केली आहे. रशियाविरूद्ध अधिक निर्बंध लादण्यावर युरोपियन संघामध्ये मतभेद आहेत. याबाबत झेलेन्स्की यांनी तक्रार केली आहे.