24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउद्योगजगतआय फोनची निर्मिती टाटा करणार

आय फोनची निर्मिती टाटा करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : टाटा समूह ही भारतासह जगभरातला नावाजलेली आहे. टाटासमुह नेहमी वेगवेगळ्या गुंतवणूकीसाठी चर्चेत येत असतो. सध्या टाटा समूह एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जे ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल. टाटा आयफोन बनविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तशी सध्या बाजारात चर्चा सुद्धा आहे.

सध्या टाटा समूह भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी तैवानच्या पुरवठादारांशी चर्चा करत आहे. जर ही चर्चा शेवटपर्यंत गेली तर टाटा आयफोन बनविण्याची शक्यता नाकारता येत नाही. विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूह आयफोन बनवतात. पण टाटाने जर आयफोन बनविला तर याचा खुप मोठा परिणाम इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिट कंपन्यांना बसणार आहे. असे म्हणतात, टाटा समूह विस्ट्रॉनच्या इंडिया ऑपरेशन्समध्ये इक्विटी खरेदी करण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे आल्या तर अ‍ॅपल आयफोन एकत्र येऊ शकतात. ब्लूमबर्गने यासंदर्भात शुक्रवारी माहिती दिली.

हा करार चीनला का आव्हान देणारा?
कोरोनाकाळापासून चीन आणि अमेरिकेचे संबंध तणावपुर्ण आहे. याचा आर्थिक दृष्ट्या मोठा फटका चीनला बसला आहे. यात जर भारताने विस्ट्रॉन सोबत करार करून आयफोन तयार केला तर इतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सला चीनवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या