24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रतौत्केमुळे जनजीवन विस्कळीत

तौत्केमुळे जनजीवन विस्कळीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणा-या तौत्के चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. रविवारपासून चक्रीवादळाचे स्वरूप तीव्र होत असल्याचे दिसून येत होते. आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे.

केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने हळूहळू सरकू लागले आहे. वादळाचा वेग ताशी २० किमी असून, वा-याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचे स्वरूप बदलले असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केले आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.

म्युकरमायकोसिसचे औरंगाबाद, उस्मानाबादला रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या