27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाचहावाल्याच्या मुलीने पटकावले सुवर्णपदक

चहावाल्याच्या मुलीने पटकावले सुवर्णपदक

एकमत ऑनलाईन

मुंबई : गुणवत्तेला कसलाही आधार लागत नाही. हिरा जसा चमकायचा राहत नाही, तशीच गुणवत्ता ही कधी ना कधी तरी सर्वांसमोर येते. ही गोष्ट पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे. कारण एका चहावाल्याच्या मुलीने खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

काजल सरगर असे या खेळाडूचे नाव असून वेटलिफ्टिंगमध्ये तिने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. सांगलीची असणारी काजलने केलेल्या दमदार कामगिरीमुळे सर्वच स्तरातून तिचे आणि कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती असूनही काजलने आपले खेळावरील प्रेम जपले आणि आज तिने सुवर्णपदक पटकावले आहे.

सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राचे नाव देशात गाजवले आहे. हरियाणा येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये काजलने वजनदार कामगिरी करत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या