27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजेत

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजेत

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद :विधानपरिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करून प्रशांत बंब यांनी नव्या वादाला तोंड फोडल्याचे दिसत आहे. घरभाडे भत्त्यावरून केलेल्या मागणीमुळे राज्यभरातील शिक्षक चिडलेले असताना, आता बंब यांच्या या नव्या मागणीवर पदवीधर आमदारांनी देखील आक्षेप घेतला आहे.

जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत शिक्षक संघटनां आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान काही दिवसच अगोदर वैजापुरमध्ये काही शिक्षक संघटनांनी समन्वय समिती स्थापन करून मोर्चा देखील काढला होता. या मोर्चामध्ये शिक्षक संघटनांशी संबंधित ६०० ते ७०० शिक्षक सहभागी झाले होते. या संदर्भाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंर्त्यांना निवेदन पाठवण्यात आले होते. हे प्रकरण तापलेलं असताना, आता

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजेत, २० वर्षांपूर्वीच खरंतर हे बंद व्हायला हवे होते. त्याऐवजी दुसरे कोणते मतदारसंघ पाहिजेत, याचा सर्वांनी मिळून विचार करावा. मी जबाबदारीने सांगतोय की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बहुतांश आमदार हे शिक्षकांना खोटा पांिठबा देतात. जे आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत ठरतील. असं आमदार प्रशांत बंब यांनी बोलताना म्हटलं आहे.

पाच सप्टेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात रस्त्यावर येणार आहेत. याशिवाय शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील प्रशांत बंब यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

माझे बोलणे खरे आहे
‘‘मी जे बोललो त्याविरोधात आंदोलन करणं, म्हणजेच माझं बोलणं किती खरं आहे आणि किती यांना लागलेलं आहे, असं दिसतं. यामधून माझा माघार घेण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही, कोणत्याही पातळीवर होत नाही. मी हे बोललो की, तुम्ही ज्या गावात राहण्याची कागदपत्रं दाखल करतात परंतु तुम्ही त्या गावात राहत नाहीत. गावात तुम्ही का येत नाही असं विचारलं तर लगेच त्यांच्यावर ३५३ कलम लावणार. विविध गुन्हे लावणार, अब्रनुकसानीचे गुन्हे नोंदवणार. म्हणजे कोणाला बोलूच द्यायचं नाही. हे सगळं या शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांमुळे होत आहे. हे सगंळ आपल्याला बंद करावे लागेल.’’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या