18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाटीम इंडियाला मिळणार नवा कोच?

टीम इंडियाला मिळणार नवा कोच?

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऑक्टोबर महिना बीसीसीआयसाठी बराच कामाचा असणार आहे. याच महिन्यात आयपीएलच्या दोन नव्या टीम घोषित होणार आहेत, सोबतच मीडिया राईट्सचे टेंडरही जाहीर केले जाणार आहेत. १७ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे, याशिवाय बीसीसीआयला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा उत्तराधिकारी शोधायचा आहे. टीम इंडियाच्या नव्या कोचच्या नियुक्तीची प्रक्रिया याच महिन्यात सुरू होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी बीसीसीआय नवीन कोच आणि सपोर्ट स्टाफच्या निवडीसाठी जाहिरात देणार आहे.

‘आम्ही आधीच टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठीच्या अटी, शर्ती निश्चित केल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात होणा-या न्यूझिलंडविरुद्धच्या सीरिजआधी टीमला नवा कोच मिळेल. या आठवड्याच्या अखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. न्यूझिलंडविरुद्धच्या सीरिजला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलनंतर तीन दिवसांनी लगेच ही सीरिज सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या