22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडाटीम इंडिया पाकिस्तान दौ-यावर जाणार

टीम इंडिया पाकिस्तान दौ-यावर जाणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीम इंडियाने २००८ नंतर पाकिस्तानचा दौरा केला नाही, पण २०२३ साली भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौ-यावर जाऊ शकते. शुक्रवारी आशियाई क्रिकेट कॉन्सिलची बैठक झाली, या बैठकीत २०२३ सालच्या आशिया कपच्या आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानला देण्यात आली. २०२३ साली वनडे वर्ल्ड कपचे आयोजनही भारतात होणार आहे, त्यामुळे पाकिस्तानची टीम भारतात येणार आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशियाई क्रिकेट कॉन्सिलच्या बैठकीत २०२३ आशिया कपची जबाबदारी पाकिस्तानला आणि २०२२ आशिया कपची जबाबदारी श्रीलंकेला देण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तान आता त्रयस्थ ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करणार नाही, असे पीसीबीने आधीच स्पष्ट केले होते. आशिया कपचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा या बैठकीमध्ये सामील झाले होते. न्यूझिलंड आणि इंग्लंडच्या टीमने नुकताच सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता.
टीम इंडिया याआधी २००८ साली पाकिस्तान दौ-यावर आशिया कप खेळण्यासाठीच गेली होती. स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले, यातल्या एका सामन्यामध्ये भारताचा आणि दुस-या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला. टीम इंडियाचा ज्या सामन्यामध्ये विजय झाला त्यात वीरेंद्र सेहवागने ११९ धावांची खेळी केली होती, याशिवाय सुरेश रैनाने ८४ धावांची विस्फोटक खेळी केली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या